देवबाग, तारकर्ली किनाऱ्यांवर जिज्ञासा फाउंडेशनतर्फे स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवबाग, तारकर्ली किनाऱ्यांवर 
जिज्ञासा फाउंडेशनतर्फे स्वच्छता
देवबाग, तारकर्ली किनाऱ्यांवर जिज्ञासा फाउंडेशनतर्फे स्वच्छता

देवबाग, तारकर्ली किनाऱ्यांवर जिज्ञासा फाउंडेशनतर्फे स्वच्छता

sakal_logo
By

59492
मालवणः जिज्ञासा फाउंडेशनतर्फे तारकर्ली, देवबाग किनाऱ्यांवर राबविलेली स्वच्छता मोहीम.

देवबाग, तारकर्ली किनाऱ्यांवर
जिज्ञासा फाउंडेशनतर्फे स्वच्छता
मालवण : जिज्ञासा फाउंडेशनतर्फे देवबाग, तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये संस्थेचे सदस्य तसेच स्थानिक हॉटेल व्यावसायिक व महिला सहभागी झाल्या होत्या. देवबाग, तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यांवर या संस्थेने तारकर्ली एमआयडीसी ते देवबाग संगम अशा पाच किलोमीटरच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी साधन सामग्री रजत दळवी व विंडमील हॉटेलचे मालक यांनी हँडग्लोव्हज, कचरा गोळा करण्यासाठी पिशव्यांची मदत केली. सूरज भोसले, बाबली चोपडेकर, वैभव खोबरेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली. या मोहिमेमध्ये स्थानिक व्यावसायिक तसेच यूट्यूबर लकी कांबळी, अंकिता प्रभुवालावलकर, मंदार शेट्ये हे देखील सहभागी झाले.
--
59513
सावंतवाडी ः येथे इंदिरा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना मान्यवर.

सावंतवाडीत गांधी, वल्लभभाईंना वंदन
सावंतवाडी ः येथील तालुका काँग्रेसच्यावतीने आज इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले. महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड. दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर, रविंद्र म्हापसेकर, आनंद परुळेकर, जाहिरा खान, समीर वंजारी, अस्लम खतीब, संतोष सावंत, अरुण नाईक, चंद्रकांत राणे आदी उपस्थित होते.

59491
आचराः यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना नीलिमा सावंत आदी.

आचरा येथे गुणवंतांचा गौरव
आचरा : आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वीतेसाठी झोकून देऊन काम करणे गरजेचे आहे. तुमच्या यशातूनच शाळेचा नावलौकिक वाढणार आहे. यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सभापती आणि आचरा हायस्कूल स्कूल समिती अध्यक्षा नीलिमा सावंत यांनी येथे केले. मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात समई नृत्य सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या आचरा कॉलेजच्या विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा सत्कार समारंभ न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल समितीतर्फे आचरा हायस्कूल येथे पार पडला. स्कूल समितीचे अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, बाबाजी भिसळे, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, कॉलेजचे प्राचार्य दळवी, भावना मुणगेकर, रावले, शिक्षक उपस्थित होते.
--
५९४८७
सिंधुदुर्गनगरीः ‘एकता दौड’मध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी.

सिंधुदुर्गनगरीत एकता दौड दिन
सिंधुदुर्गनगरीः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि भारतीय डाकघर विभागाच्यावतीने आज ‘राष्ट्रीय एकता दौड’ दिवस राजरा करण्यात आला. सकाळी साडेसातला येथील क्रीडा संकुल ते ओरोस फाटा या मार्गावर ही एकता दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा प्रांगणात याची सांगता करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक अधीक्षक विनायक कुलकर्णी, सुकळवाडचे पोस्टमास्तर राम वेंगुर्लेकर, विकास अधिकारी बालाजी मुंडे आदी सहभागी झाले.
..............
नट वाचनालयातर्फे कथाकथन स्पर्धा
बांदाः येथील नट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णू नारायण गांवकर आडाळी पुरस्कृत (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गांवकर व (कै.) बिपीन विष्णू गांवकर यांच्या स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबरला सकाळी दहाला नट वाचनालयात होणार आहे. स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून तिसरी व चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन शालेय गटांत होणार आहे. तिसरी व चौथी गटासाठी ‘साने गुरुजींची कथा’ हा विषय असून वेळ ३ मिनिटे आणि पाचवी ते सातवी गटासाठी ''थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग'' हा विषय असून वेळ ४ मिनिटे दिला आहे. पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्वीकारले जातील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल प्रमिला नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.