गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जागा ‘मत्स्यव्यवसाय’ला द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील 
जागा ‘मत्स्यव्यवसाय’ला द्या
गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जागा ‘मत्स्यव्यवसाय’ला द्या

गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जागा ‘मत्स्यव्यवसाय’ला द्या

sakal_logo
By

59493
मुंबई : राज्‍याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना निवेदन देताना आमदार नीतेश राणे.


गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील
जागा ‘मत्स्यव्यवसाय’ला द्या

आमदार नितेश राणे; महसूल मंत्र्यांना निवेदन

कणकवली, ता.३१ : गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जमिनीपैकी २६ हेक्टर जागा नियोजित मत्स्य व्यवसाय महाविद्यालयासाठी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. तसे त्यांना निवेदनही देण्यात आले.
श्री. विखे पाटील यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले की, देवगड गिर्ये येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करण्याबाबत मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. त्‍यानुसार मत्स्य विद्यालयाचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. मत्स्य महाविद्यालयासाठी २६ हेक्टर जागा आवश्यक आहे. मौजे गिर्ये (ता. देवगड) येथील भूमापन क्रमांक १३६ ठिकाणाचे नाव कुडेटेंब ही ४१ हेक्टर जागा महासंचालक, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, पुणे यांचे नावे असून ती सद्या रिक्त आहे. तरी सदर जागेपैकी २६ हेक्टर जागा मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी मिळावी, अशी मागणी केली आहे.