कणकवली संघटकपदी वैदेही गुडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली संघटकपदी वैदेही गुडेकर
कणकवली संघटकपदी वैदेही गुडेकर

कणकवली संघटकपदी वैदेही गुडेकर

sakal_logo
By

59494
(केवळ वैदेहीचाच फोटो वापरा)

कणकवली संघटकपदी वैदेही गुडेकर

ठाकरे गट; देवगडसाठी ठाकूर, घाडीगावकरांची नियुक्ती

कणकवली, ता.३१ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात कणकवली तालुका संघटकपदी वैदही गुडेकर, देवगड तालुका संघटकपदी हर्षा ठाकूर आणि सायली घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा महिला संघटक नीलम सावंत पालव यांनी ही माहिती दिली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक व लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या सूचनेनुसार या नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुका संघटक पदी कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर देवगड तालुका संघटक पदी विभागून निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात देवगड शहर, शिरगाव, मिठबाव, कुणकेश्वर या जि. प. मतदार संघ संघटकपदी हर्षा ठाकूर यांची निवड केली आहे. तर बापार्डे, पुरळ, पडेल, पोंभुर्ले या जिल्हा परिषद मतदार संघासाठी सायली घाडीगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
--
प्रभुगावकर, कासार यांचीही नियुक्‍ती
कुडाळ-मालवण मतदार संघाच्या विधानसभा प्रमुखपदी संग्राम प्रभूगावकर यांची निवड करण्यात आली. तर सावंतवाडी उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत कासार आणि सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोझा यांची निवड झाल्याची माहिती सावंत-पालव यांनी दिली.