मंडणगड- पहाटे भात कापणी; दुपारनंतर अडगवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड- पहाटे भात कापणी; दुपारनंतर अडगवणी
मंडणगड- पहाटे भात कापणी; दुपारनंतर अडगवणी

मंडणगड- पहाटे भात कापणी; दुपारनंतर अडगवणी

sakal_logo
By

rat31p9.jpg
59453
मंडणगडः तालुक्यात भातकापणीच्या कामाला वेग आला आहे.
rat31p10.jpg
59433
कापणी केलेला भात भारे बांधून घरी आणताना शेतकरी.
rat31p11.jpg
59434
भाताची अडगवणी करताना शेतकरी.
--------------
पहाटे भातकापणी; दुपारनंतर अडगवणी
मंडणगड तालुका; धान्य घरात आणण्याची घाई
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ः तालुक्यातील भातशेती तयार झाली असून पिके कापणीला सुरवात झाली आहे. उन्हाचा कडाका वाढू लागल्याने शेतकरी पहाटे शेतात कापणीला जात असून दुपारनंतर कापलेले भाताचे भारे बांधून घरी आणले जात असल्याचे चित्र मंडणगडात दिसत आहे. घराच्या अंगणात त्याचा उडवी स्वरूपात साठा केला जात आहे.
या भातपिकाचा सोनेरी पिवळसर रंग दिसून येत आहे; मात्र जंगली श्वापदामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हवामानात काही दिवसांपासून एकदम बदल झाला आहे. दुपारच्यावेळी कडक ऊन तर सायंकाळच्यावेळी पावसाचे वातावरण तयार होते. तालुक्यात यावर्षी जवळपास पाच हेक्टरवर लागवड झाली. यावर्षी सुरवातीपासूनच भातपिकाला पोषक असा पाऊस झाल्याने पीकही जोमाने आले आहे. भाताची वाढही चांगल्याप्रमाणे झाली आहे; मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने भाताच्या लोंबीवर थोडा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे माकडे, डुकरं, केलटी जंगली जनावरांकडून भातपिकांची नासाडी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. पक्ष्यांचे थवेच्या थवे दाण्यांवर डल्ला मारत आहेत. वर्षभर शेतात राबून हातातोंडाला आलेले पीक वाया जाणार या भीतीने शेतकरी चिंतातूर आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात मचाण बांधले असून बुजगावणी उभी केली आहेत. शेतकरी शेतात दिसू लागल्याने खलाटी गजबजल्या आहेत.