लांजा-वेरळ घाटातील खड्डा ठरतोय जीवघेणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-वेरळ घाटातील खड्डा ठरतोय जीवघेणा
लांजा-वेरळ घाटातील खड्डा ठरतोय जीवघेणा

लांजा-वेरळ घाटातील खड्डा ठरतोय जीवघेणा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat31p27.jpg -KOP22L59498 ः लांजा ः वेरळ येथील अवघड वळणावर पडलेला तो खड्डाच ठरतोय अपघातास कारणीभूत.
-----------------

वेरळ घाटातील खड्डा ठरतोय जीवघेणा
दोन दिवसात दोन अपघात ; अवजड वाहनांच्या अपघाताने वाहतूक कोंडी

लांजा, ता. ३१ ः मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात यु आकाराच्या अवघड वळणावर पडलेला तो खड्डाच कंटेनरसारख्या अवजड वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याची बाब पुढे आली आहे.
वेरळ येथील यु आकाराच्या अवघड वळणावर कंटेनरसारख्या वाहनांचे सातत्याने एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत या ठिकाणी कंटेनरचे सात ते आठ अपघात झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या एकाच ठिकाणी दोन कंटेनरचे पाठोपाठ अपघात झाले होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरसारख्या अवजड वाहनांना या अवघड वळणाच्या ठिकाणी असलेला खड्डाच अपघातास कारणीभूत ठरत आहे. या खड्ड्यांमुळे अवजड वाहने उलटत असून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र असे असूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा खड्डा बुजवण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. वळणाबरोबर मध्यभागी उंच सखल भागामुळे आणि खड्ड्यामुळे या ठिकाणी अपघाताची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी पडलेला खड्डा हा तातडीने बुजवावा आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांतून केली जात आहे.