कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौड
कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौड

कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौड

sakal_logo
By

kan316.jpg
59508
कणकवली : येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अखंडता आणि एकात्मतेची शपथ घेतली.

कणकवली महाविद्यालयात
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दौड
शहरातून जनजागृती फेरी : देशाची अखंडता आणि एकात्मता
कणकवली, ता. ३१ : कणकवली महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रम झाला. याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कणकवली महाविद्यालय ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावरून राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली. यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एचपीसीएल सभागृहात देशाची सुरक्षा अखंडता आणि एकात्मता अबाधित राहण्याची व समर्पित भावनेने राष्ट्र कार्यात सहभागी होण्याची शपथ प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी दिली.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. सागर गावडे, प्रा. अदिती मालपेकर, प्रा. विनया रासम व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. जयश्री कसालकर, वरिष्ठ लिपिक संजय ठाकूर, ग्रंथपाल विजय परब, मंगेश आरेकर उपस्थित होते.