मत्स्य महाविद्यालयासाठी गिर्येत जागा उपलब्ध करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्य महाविद्यालयासाठी
गिर्येत जागा उपलब्ध करा
मत्स्य महाविद्यालयासाठी गिर्येत जागा उपलब्ध करा

मत्स्य महाविद्यालयासाठी गिर्येत जागा उपलब्ध करा

sakal_logo
By

59512
मुंबई ः येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना निवेदन देताना आमदार नीतेश राणे.

मत्स्य महाविद्यालयासाठी
गिर्येत जागा उपलब्ध करा
आमदार राणेंची मागणी; महसूलमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३१ ः मत्स्य महाविद्यालयासाठी तालुक्यातील गिर्ये येथील आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना मुंबईत दिले.
तालुक्यात गिर्ये परिसरात मत्स्य महाविद्यालय उभारणीच्या अनुषंगाने आमदार राणे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची मुंबईत भेट घेतली. यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राणे यांनी त्यांच्याकडे केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्यात गिर्ये येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीनुसार प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. मत्स्य महाविद्यालयासाठी सुमारे २६ हेक्टर जागा आवश्यक आहे. तालुक्यातील गिर्ये येथील भूमापन क्रमांक १३६ ही कुडेटेंब नावाची ४१ हेक्टर जागा महासंचालक, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, पुणे यांच्या नावे आहे. ती जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या जागेपैकी सुमारे २६ हेक्टर जागा मत्स्य महाविद्यालयासाठी देण्याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणी केली आहे.