कोकण आवृत्तीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण आवृत्तीसाठी
कोकण आवृत्तीसाठी

कोकण आवृत्तीसाठी

sakal_logo
By

कोकण आवृत्तीसाठी....

फोटो - KOP22L59559

शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जावे
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के ः सकाळ माध्यम समूहातर्फे ‘गुरुवंदना’ ॲवॉर्डचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : ज्ञानदानाचे काम करताना शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे केले. शिक्षकांच्या हातात तरुण पिढीचे भविष्य असून, छोट्या गोष्टी खूप मोठा बदल घडवून आणू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ माध्यम समूहातर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा ‘गुरुवंदना’ ॲवॉर्ड देऊन आज येथे सन्मान झाला. त्या वेळी ते बोलत होते. सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र उपक्रमांतर्गत हॉटेल सयाजी येथे कार्यक्रम झाला.
डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल, श्रेयांक याविषयीची चर्चा माध्यमिक ते विद्यापीठ स्तरावर सुरू आहे. या स्थितीत शिक्षक म्हणून जबाबदारी कोणती, त्यांची मानसिकता काय, याचाही विचार करावा लागतो. कोरोना काळात दोन वर्षे शिक्षक व विद्यार्थ्यांवर सर्वाधिक ताण होता. त्यावर मात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची वर्षे वाया जाण्यापासून वाचवली. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय, विद्यापीठ असे प्रकार नसतात. प्रत्येक शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत असतो.’’
ते म्हणाले, ‘‘एक व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात काय योगदान देऊ शकते, ‘बनगरवाडी,’ व ‘माझी काटेमुंधरीची शाळा,’ कादंबऱ्यांच्या वाचनातून समजून आले. शिक्षकांना केंद्रबिंदू ठेवून त्यांचे लिखाण झाले आहे. जसा शिक्षक विद्यार्थ्याला घडवत असतो, तसा विद्यार्थी ज्ञान देणारा असतो. जिथे शाळा तिथे शिक्षकांचे वास्तव्य वेगळे समाधान देणारे असते. माझ्या शालेय जीवनात दहा बाय दहाच्या खोलीत संसार मांडलेले शिक्षक शिकवायचे. शाळा सुटल्यानंतरही त्याच खोलीत ज्ञानदानाचे काम करायचे.’’
शिक्षक वेळापत्रकाच्या चौकटीत काम करत नाही. तंत्रज्ञानाच्या जमान्यात कधीही, कोठेही व कोणालाही शिक्षण देता येते. समाजातील प्रश्‍न लक्षात घेऊन शिक्षण देणे सोपे झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘शैक्षणिक क्षेत्रात धडपडणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याच्या उद्देशाने शिक्षकांना सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात काम करणारी फळी मोठी आहे. जिल्हा, विभाग स्तरावर त्यांचा सन्मान केला जावा, याकरिता समाजातर्फे ‘सकाळ’ने जबाबदारी घेतली आहे. भवताली घडणाऱ्या घडामोडींची माहिती देत जे जे करता येईल, ते ‘सकाळ’ करत आहे. समाजाच्या गरजा ओळखून काम केले जात आहे. सन्मान सोहळ्याची मालिका त्याच पठडीतील आहे.’’ असे सांगून ते म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक काम करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाचा मूळ उद्देश व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा असून, त्यात सर्वाधिक वाटा शिक्षकांचा आहे. आव्हानांना सामोरे जाणारी पिढी तयार न केल्यास ती बरबाद होते.’’
या वेळी सहयोगी संपादक शेखर जोशी, सहायक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके उपस्थित होते. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले.


* यांचा झाला गौरव...
- प्राचार्य मंगेश भोसले (सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे), अमेय गोडबोले (संस्थापक, गोडबोले क्लासेस, चिपळूण), विनायक माळी (पर्यवेक्षक, आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय व कॉलेज, चिपळूण), उमाशंकर ऊर्फ बाळ दाते (संगीत शिक्षक, राजापूर), सुहास वाडेकर (अष्टपैलू शिक्षक, नाखरे), राजेश जाधव (क्रीडा शिक्षक, वाटद-खंडाळा), प्रा. आनंद आंबेकर (रत्नागिरी), प्रा. राजेंद्र कृष्णा कदम (जांबवडे, ता. कुडाळ), डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत (आंबोली, ता. सावंतवाडी).