रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त

लोकशाही दिन ७ नोव्हेंबरला
रत्नागिरी ः दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. नोव्हेंबर २०२२ चा लोकशाही दिन ७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात १ ते २ या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरीता नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.


ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीसाठी आवाहन
रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या मातापिता व जेष्ठ नागरिक यांच्या निर्वाह व कल्याण अधिनियम आणि आई- वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याण अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या समितीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघातील पात्र आणि इच्छुक जेष्ठ नागरिकांची नावे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण या कार्यालयाला कळवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.