वेरळ घाटातील खड्डा जीवघेणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेरळ घाटातील खड्डा जीवघेणा
वेरळ घाटातील खड्डा जीवघेणा

वेरळ घाटातील खड्डा जीवघेणा

sakal_logo
By

वेरळ घाटातील खड्डा जीवघेणा
लांजा ः मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात यु आकाराच्या अवघड वळणावर पडलेला तो खड्डाच कंटेनरसारख्या अवजड वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याची बाब पुढे आली आहे. वेरळ येथील यु आकाराच्या अवघड वळणावर कंटेनरसारख्या वाहनांचे सातत्याने एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत या ठिकाणी कंटेनरचे सात ते आठ अपघात झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या एकाच ठिकाणी दोन कंटेनरचे पाठोपाठ अपघात झाले होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरसारख्या अवजड वाहनांना या अवघड वळणाच्या ठिकाणी असलेला खड्डाच अपघातास कारणीभूत ठरत आहे. या खड्ड्यांमुळे अवजड वाहने उलटत असून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र असे असूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा खड्डा बुजवण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. वळणाबरोबर मध्यभागी उंच सखल भागामुळे आणि खड्ड्यामुळे या ठिकाणी अपघाताची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी पडलेला खड्डा हा तातडीने बुजवावा आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांतून केली जात आहे.
--
‘संस्कृत शिकण्याची संधी’
रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे (नवी दिल्ली) अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र येथील गोगटे-जोगळेर महाविद्यालयात सुरू आहे. यामध्ये संस्कृत शिकण्याची संधी सर्वांना मिळणार असून यात किमान दहावी उत्तीर्ण झालेले व कोणत्याही शाखेचे विद्यार्थी, पालक, गृहिणी, नोकरदार सहभागी होऊ शकतात. संस्कृतभाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम आणि संस्कृतभाषा दक्षता पाठ्यक्रम असे दोन अभ्यासक्रम आहेत. याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आठवड्यातून ३ किंवा ४ दिवस रोज एक तास दिवसातून सोयीच्या वेळी प्रवेश घेऊ शकता. याकरिता बॅचेसच्या वेळा सकाळी ०९ ते १०, ११ ते १२, आणि सायंकाळी ४ ते ५ व ५ ते ६ अशा आहेत. प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी मे २०२३ पर्यंत आहे. प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२२ आहे.