''ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम, प्रवेश, करिअर संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’
अभ्यासक्रम, प्रवेश, करिअर संधी
''ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम, प्रवेश, करिअर संधी

''ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम, प्रवेश, करिअर संधी

sakal_logo
By

लोगो - एसआयआयएलसी
------
''ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’
अभ्यासक्रम, प्रवेश, करिअर संधी
पदवीधरांसाठी कोल्हापूर येथे चार नोव्हेंबरला विशेष सेमिनार
कोल्हापूर, ता. ३१ : या वर्षी किंवा गेल्या वर्षी बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, बीबीए, बीई, बीटेक, बीएस्सी ॲग्री आदींपैकी कोणताही पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व याद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकरी व व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारा विनामूल्य सेमिनार शुक्रवारी (ता. ४) कोल्हापूर सकाळ कार्यालयात आयोजिला आहे.
‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा सखोल तसेच इण्डस्ट्रींनी आखलेला अभ्यासक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात काही व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा आहे वा चांगला जॉब मिळवायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविणारा हा प्रोग्रम आहे. सेमिनारमध्ये कोर्सच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरमध्ये कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, या विषयी मार्गदर्शन होईल. सेमिनार मोफत असून यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

चौकट
सेमिनार वार आणि तारीख ः शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२
वेळ ः दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत
सेमिनारचे ठिकाण ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नाव नोंदणीसाठी संपर्कः ९१४६०३८०३१