चिपळूण ः चिपळुणात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळुणात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
चिपळूण ः चिपळुणात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

चिपळूण ः चिपळुणात जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

sakal_logo
By

जळलेल्या अवस्थेत
चिपळुणात महिलेचा मृतदेह
चिपळूण, ता. ३१ ः शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथे महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे शहरपरिसरात चर्चेला उधाण आले आहे. आज (सोमवारी) सकाळी ही घटना घडल्याचे वृत्त असून सायंकाळी उशिरा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार सायंकाळी उशिरा उजेडात आला. पेठमाप मुकादम मोहल्ला येथील गनी मुकादम यांच्या घरांमध्ये संबंधित महिला भाडेकरू होती. या महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. सायंकाळी सातनंतर चिपळूण पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून उशिरापर्यंत मृत महिलेचे नाव समजू शकले नाही. दरम्यान या महिलेने जाळून घेत स्वतः आत्महत्या केली की, तिला जाळून मारण्यात आले, याबाबत संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिस घटनास्थळी जाऊन चौकशी करत आहेत.