खोरा बंदरात पर्यटकांची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोरा बंदरात पर्यटकांची कोंडी
खोरा बंदरात पर्यटकांची कोंडी

खोरा बंदरात पर्यटकांची कोंडी

sakal_logo
By

खोरा बंदरात पर्यटकांची कोंडी
मुरूड, ता. ३१ ः पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने मुरूड परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत; पण या परिसरात वाहनतळच नसल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक वेठीस धरले जात आहेत. विशेष म्हणजे, मेरिटाईम बोर्डातर्फे मुरूड खोरा बंदरात सुमारे १ कोटी खर्च करून वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे, पण दप्तर दिरंगाईमुळे या वाहनतळाचा वापर करता येत नसल्याने मोरा बंदरात पर्यटकांची कोंडी होत आहे.
दिवाळीतील सलग सुट्यांनंतर सुरू असलेल्या पर्यटन हंगामासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मुरूड परिसरात दाखल होत आहेत.
मुरूडमधील जंजिरा किल्ल्याबरोबरच ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी सध्या तीन ठिकाणांवरून प्रवाशांची जलवाहतूक होत आहे. यात राजपुरी जेट्टी, खोरा बंदर आणि दिघी जेट्टीवरून प्रवाशांना जाता येत आहे. मात्र, राजपुरी, दिघी वगळता खोरा बंदरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, खोरा बंदरात मेरिटाईम बोर्डकडून ४०० वाहने उभी करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पण तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी या वाहनतळाला परवानगी मिळाली नसल्याने शेकडो वाहने रस्त्यावर उभी करण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे.
--
कोट
खोरा बंदरातील वाहनतळाबाबत वरिष्ठ कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांचे आदेश प्राप्त होताच खोरा बंदरातील वाहनतळ खुले करण्यात येईल.
- हितेंद्र बारापात्रे, बंदर निरीक्षक