रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्रात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड जिल्ह्यात 
शेती क्षेत्रात घट
रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्रात घट

रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्रात घट

sakal_logo
By

रायगड जिल्ह्यातील
शेती क्षेत्रामध्ये घट
महाड, ता. ३१ : विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पिकवाढीकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण भरपूर असल्याने येथे भात शेती, नाचणी अशी पिके घेतली जातात. पावसाच्या प्रमाणाचा विचार करूनच जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो. जिल्ह्यात भातशेतीनंतर विविध कडधान्ये, तूर लागवडही येथील शेतकरी करत असे. परंतु, गेल्या काही वर्षांत रायगडातील चित्र बदलले आहे. औद्योगिकीकरणाबरोबरच येथील पर्यटनही आता वाढू लागले आहे. त्यामुळे शेतजमिनीचा वापर अकृषिक कामासाठी वाढला आहे. परिणामी, पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. जिल्ह्यात आठ वर्षांपूर्वी खरीप भात लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३० हजार हेक्टर एवढे होते. २०१९ पर्यंत हे क्षेत्र १ लाख १४ हजारांवर आले. आता ते केवळ १ लाख हेक्टरवर आले आहे. जिल्ह्यातील तब्बल २८ ते ३० हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र घटले आहे.
--
कोट
अनेक कारणांमुळे शेती कमी होत आहे. त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा पर्याय आता शेतकऱ्यांनी स्वीकारला पाहिजे. यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला पाहिजे.
- प्रकाश सरतापे, कृषी विस्तार अधिकारी, महाड