सुनांच्या मारहाणीत सासू गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनांच्या मारहाणीत सासू गंभीर
सुनांच्या मारहाणीत सासू गंभीर

सुनांच्या मारहाणीत सासू गंभीर

sakal_logo
By

सुनेच्या मारहाणीत सासू गंभीर

सावंतवाडीतील घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः घरगुती वादातून सुनेने सासूला लोखंडी नळीने मारहाण केल्याची घटना शहरातील बाहेरचावाडा परिसरात घडली. यात सासू हसीना भाऊद्दिन ख्वाजा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार आज सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, सासूने दिलेल्या तक्रारीनुसार दोन मुलांसह सुनांविरोधात येथील पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलिस डुमिंग डिसोझा यांनी दिली.
जखमी ख्वाजा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा दोन मुलांसह सुनांकडून छळ सुरू आहे. वारंवार शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. आज सकाळी एका सुनेने लोखंडी पाईपने त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानुसार रमिजा ख्वाजा, नसीरा ख्वाजा, रेहान ख्वाजा व सरफराज ख्वाजा यांच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.