हत्ती नुकसानीची १५ दिवसांत भरपाई ः उपवनसंरक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्ती नुकसानीची १५ दिवसांत 
भरपाई ः उपवनसंरक्षक
हत्ती नुकसानीची १५ दिवसांत भरपाई ः उपवनसंरक्षक

हत्ती नुकसानीची १५ दिवसांत भरपाई ः उपवनसंरक्षक

sakal_logo
By

हत्ती नुकसानीची १५ दिवसांत
भरपाई ः उपवनसंरक्षक

मनसेच्या मागणीची घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः दोडामार्ग तालुक्यात हत्तींपासून झालेल्या नुकसानीची भरपाई १५ दिवसात नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाईल. वनविभागाच्या माध्यमातून हत्ती प्रतिबंधक सोलर कुंपण उभारण्यात येईल, अशी ग्वाही उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. हत्तींचा जास्त वावर असलेल्या गावात स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपवनसंरक्षक रेड्डी यांची भेट घेतली. याप्रसंगी तालुक्यातील वनविभागाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, प्रवीण गवस, महेंद्र कांबळी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मनसेचे पदाधिकारी प्रवीण गवस यांनी काही दिवसापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या विषया संदर्भात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात हा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी बोलून येत्या पंधरा दिवसात हा निधी नुकसानग्रस्तांना देण्यात येईल तसेच वनविभागाच्या माध्यमातून हत्ती प्रतिबंधक सोलर कंपाउंड उभारण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आपण आपल्या काही कर्मचाऱ्यांना कर्नाटक भुज येथून प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी व गावकरी यांना ज्या ठिकाणी हत्तींचा वावर जास्त आहे, त्या गावांमध्ये प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही आपल्या माध्यमातून करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.