ढील दे ढील दे देरे भैया, उस पतंग को ढील दे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढील दे ढील दे देरे भैया, उस पतंग को ढील दे!
ढील दे ढील दे देरे भैया, उस पतंग को ढील दे!

ढील दे ढील दे देरे भैया, उस पतंग को ढील दे!

sakal_logo
By

59624
कुडाळ ः राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आयोजित पतंग उडविणे स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. (छायाचित्र ः अजय सावंत)


ढील दे ढील दे देरे भैया, उस पतंग को ढील दे!

कुडाळची पतंग उडवणे स्पर्धा; काँग्रेसतर्फे दीपोत्सवानिमित्त उपक्रम, ४० जणांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः शहर राष्ट्रीय काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव २०२२ निमित्त रविवारी (ता. ३०) येथे घेण्यात आलेल्या पतंग उडविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान व मोठ्या अशा दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. लहान मुलांसह युवकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
काँग्रेसच्यावतीने दीपोत्सवानिमित्त किल्ले बनविणे, आकाशकंदील, बैलगाडी सजावट, सुदृढ बैल-रेडा स्पर्धेसह पतंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्वच स्पर्धांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सायंकाळी काळपनाका नजीकच्या नवीन एसटी डेपोच्या मैदानावर पतंग स्पर्धा उत्साहात पार पडली. काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास शिरसाट, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, दिनार पडते, अल्संख्यांक सेल तालुकाध्यक्ष तरबेज शेख, शहराध्यक्ष तौसिफ शेख, वैभव आजगावकर, हाजिम शेख, सागर जाधव, महेश आळवे, शैलेश काळप आदी उपस्थित होते.
स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात दयानंद मेस्त्री, इमरान शेख, शोएब कर्णेकर, यश वाळके, रिघन कर्णेकर, आकीर गोलंदाज, गिरीश कांबळी, चिन्मय कांबळी, आराध्या नाईक, चैतन्या कांबळी, मोहम्मद शेख, शार्दूल राऊळ, राहूल शिरसाट, फैजान शेख, अल्फात शेख, अजमद मुजावर, झितान शेख, मयुरेश आळवे, पराशर शेलटकर यांनी, तर १५ वर्षांवरील गटात प्रणव मेस्त्री, सत्यम मेस्त्री, शैलेश काळप, ज्ञानेश्वर आळवे, सिध्देश पालव, नितीन मेस्त्री, पोईंट गोलंदाज, उस्मान कर्णेकर, आशिष काळप, ओंकार साळवी, सुजल मुननकर, गोट्या धुरी आदींसह जवळपास ४० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता. ६) सकाळी अकराला येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित केला आहे.