पोलिस दलातर्फे स्मृतीदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस दलातर्फे स्मृतीदिन उत्साहात
पोलिस दलातर्फे स्मृतीदिन उत्साहात

पोलिस दलातर्फे स्मृतीदिन उत्साहात

sakal_logo
By

rat१p१.jpg
५९६०३
रत्नागिरी ः पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिसदलाकडून बॅंड शो सादर करणारे पोलिस दलातील कर्मचारी, अधिकारी.
-------
पोलिस दलातर्फे स्मृतीदिन उत्साहात
रत्नागिरी ः पोलिस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्यावतीने वीर पोलिस जवानांना अभिवादन करण्यात आले. पोलिस बॅंड पथकाकडून नुकतेच रत्नागिरी रेल्वेस्टेशन, मारुतीमंदिर, रामनाका, मांडवी या ठिकाणी बॅंड शो सादर करण्यात आला. पोलिस स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसदलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले अधिकारी व अंमलदार यांच्याप्रती नागरिकांमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी या हेतूने महाराष्ट्र पोलिस दलाच्यावतीने २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पोलिस बॅंड पथकाच्यावतीने सादरीकरण करण्यात येते. त्यानुसार जिल्हा पोलिसदलाकडून २९ ऑक्टोबरला रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात बॅंड शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोला स्थानिक नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून सर्व स्तरातून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
-----
ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीत सदस्य नेमणार
रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ची व आई-वडिल आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणकारी अधिनियम २०१० च्या अमंलबजावणीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक व संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याकडून दोन अशासकीय सदस्य यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने समितीमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघातील पात्र आणि इच्छुक ज्येष्ठ नागरिकांची नावे सहाय्यक आय़ुक्त, समाजकल्याण या कार्यालयास कळवावीत, असे आवाहन समाजकल्याण, रत्नागिरी यांनी केले आहे.
-----
बौद्धजन पंचायत समितीचे शिबिर उत्साहात
रत्नागिरी ः बौद्ध धर्माच्या जडणघणीत, प्रचार व प्रसार तसेच बौद्धांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचे संपादन करण्यात बौद्धाचार्यांचे योगदान असते. गौतम बुद्ध, बुद्धघोष, नागार्जुन आदी विद्वान बौद्धाचार्यांची विचारधारणा पुढे नेण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती व तालुका रत्नागिरी व संस्कार समिती यांच्यातर्फे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे झालेल्या बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात झाले. मुंबई बौद्धजन पंचायत समितीचे अतिरिक्त सरचिटणीस रवींद्र पवार, अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले. या वेळी सुहास कांबळे, विजय आयरे, संजय आयरे, रविकांत पवार, सावंत, कदम, काशिनाथ तांबे, कृष्णाजी जाधव, विलास कांबळे यांच्यासह ६० बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना, संस्थापक, संस्थेची कार्यकारिणी, नियमावली, उपक्रम, ध्येय धोरणे तसेच बुद्ध आणि त्यांच्या धम्म डॉ. आंबेडकर धम्मक्रांती, सम्राट अशोक, संत कबीर, फुले यांच्या मानवतावादी क्रांतीचे प्रवचन दिले. सूत्रसंचालन रविकांत पवार यांनी केले.