चिपळूण ः दिवा पॅसेंजरच्या संगमेश्वर, चिपळूण, खेडच्या बोगी पूर्वीप्रमाणे सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः दिवा पॅसेंजरच्या संगमेश्वर, चिपळूण, खेडच्या बोगी पूर्वीप्रमाणे सुरू करा
चिपळूण ः दिवा पॅसेंजरच्या संगमेश्वर, चिपळूण, खेडच्या बोगी पूर्वीप्रमाणे सुरू करा

चिपळूण ः दिवा पॅसेंजरच्या संगमेश्वर, चिपळूण, खेडच्या बोगी पूर्वीप्रमाणे सुरू करा

sakal_logo
By

संगमेश्वर, चिपळूण, खेडसाठी
राखीव तीन डब्यांची मागणी
दिवा पॅसेंजर; शौकत मुकादम वेधले लक्ष
चिपळूण, ता. १ ः रत्नागिरीहून दिव्याकडे जाणाऱ्या पॅसेंजरचे पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे तीन डबे राखीव होते; मात्र कोरोना महामारीच्या काळात हे डबे रद्द करण्यात आले. ते आता पूर्वीप्रमाणे सुरू केल्यास तोट्यात जाणाऱ्या कोकण रेल्वेला दिलासा मिळेल. कोकण रेल्वे रो-रो सेवेवर अधिक लक्ष्य केंद्रित करत आहे. त्यांनी प्रवासी वाहतुकीवर अधिक लक्ष दिल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होईल; परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोकण रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती दादर पॅसेंजर चालू करण्याबाबत मागणी करत आहे. रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला पूर्वी संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी ती डबे राखीव होते. गाडी सुटताना पूर्वी हे डबे आतून कडी लावून बंद करण्यात येत होते. स्टेशन आल्यावर ते उघडले जात होते. कोरोनाच्या काळात ते डबे प्रवासी कमी असल्याने बंद केले होते; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे दिवा पॅसेंजरचे हे तीन डबे पूर्वीप्रमाणे संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव ठेवावेत म्हणजे प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेला अधिकचा फायदा होईल. सध्या सर्वच पॅसेंजर फुल्ल असतात. प्रवाशांना बसायला जागाच नसते. दिवा पॅसेंजर दादरपर्यंत न्यावी. रेल्वे प्रशासन रो-रो सेवेकडे जसे अधिकचे लक्ष देते तसेच लक्ष त्यांनी प्रवासी वाहतुकीकडे द्यावे. रेल्वेतील जेवणाचे दरही अव्वाच्या सव्वा असल्याने सामान्य माणसाला ते परवडत नाहीत ते कमी करावेत. प्रवाशांच्या हितासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणी करत कोकण रेल्वेचे खासगीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.