चित्रकला स्पर्धेस वेंगुर्लेत प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला स्पर्धेस
वेंगुर्लेत प्रतिसाद
चित्रकला स्पर्धेस वेंगुर्लेत प्रतिसाद

चित्रकला स्पर्धेस वेंगुर्लेत प्रतिसाद

sakal_logo
By

चित्रकला स्पर्धेस
वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्ले ः श्री क्षेत्र हरिचरणगिरी मठात दीपावलीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे लहान गटात पार्थ कोचरेकर, जिग्नय तांडेल, रौनक नाईक, तर उत्तेजनार्थ सीया मठकर, दुसऱ्या गटात आर्या प्रभुखानोलकर, वेदांत खवणेकर, वेदांग कुडव, उत्तेजनार्थ हर्षल शिरोडकर व दत्ताराम मठकर, तर तरुण गटात नवनीत मठकर, तन्मय तांडेल, चंदना आमडोसकर यांनी क्रमांक पटकावले. विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, रस्सीखेच यासारखे खेळ झाले. विजेत्यांना पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले.
-------------
श्रीराम राज्य रथ
४ला कणकवलीत
कणकवली ः श्रीराम राज्य रथयात्रा २०२२ ही विजयादशमी ५ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून भारत व नेपाळ येथे ६० दिवसांचा प्रवास पूर्ण करून ३ डिसेंबरला या यात्रेचा अयोध्येत समारोप होणार आहे. याचे नेतृत्व शक्ती शांतानंद महर्षी करीत आहेत. या यात्रेचे आगमन शुक्रवारी (ता. ४) दुपारी साडेबाराला कणकवलीत होणार आहे. यात्रेचे स्वागत आप्पासाहेब पटवर्धन चौकात होणार असून स्वागतासाठी सर्वांनी हार, फुले, प्रसादाची व्यवस्था स्वतः करून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या सेवा विभागाचे प्रमुख नंदकुमार आरोलकर व जिल्हा उपाध्यक्ष मोहन सावंत यांनी केले.
-------------
हरिनाम सप्ताहास
साळगावला प्रारंभ
कुडाळ ः साळगाव येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहाला उत्साहास प्रारंभ झाला. शुक्रवारी (ता. ४) या सप्ताहाची सांगता होणार आहे. शनिवारी सकाळपासून पारंपरिक विधींनी या सप्ताहाला प्रारंभ झाला. रोज स्थानिक ग्रामस्थांच्या भजनांनी अखंड हरिनाम जागर सुरू आहे. या हरिनाम सप्ताहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ (साळगाव-गावडेवाडी) व समस्त विठ्ठल भक्तांनी केले आहे.
--
ज्येष्ठ नागरिक
संघाची सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवारी (ता. ५) सकाळी साडेदहाला ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासद बंधू भगिनींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.