बचतगटांच्या विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटांच्या विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद
बचतगटांच्या विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद

बचतगटांच्या विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद

sakal_logo
By

59660
सिंधुदुर्गनगरी ः उमेद अंतर्गत उभारण्यात आलेल्या बचतगट उत्पादित माल विक्री प्रदर्शनात सहभागी महिला.

बचतगटांच्या विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद

सहा समुहांचा सहभाग; पाच दिवसांत ७७ हजार ४७० रुपयांची विक्री

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः दिवाळी उत्सवानिमित्त उमेद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पाच दिवस भरविण्यात आलेल्या बचतगट उत्पादित मालाच्या विक्री प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात जिल्ह्यातील सहा महिला बचतगट समुहानी सहभाग घेतला होता. ७७ हजार ४७० रुपयांची एकूण विक्री या कालावधीत झाली आहे.
उमेद-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील बचतगटांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी याचा शुभारंभ केला होता. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात माडखोल (ता.सावंतवाडी) येथील हिरकणी प्रभाग संघ, कुडाळ तालुक्यातील अनमोल प्रभागसंघ, ओवळीये (ता.मालवण) येथील कन्यारत्न स्वयं सहाय्यता संघ, कुलस्वामिनी स्वयं सहाय्यता महिला संघ, अनमोल प्रभाग संघ स्वामी समर्थनगर ओरोस, जिजामाता फळ प्रक्रिया केंद्र किर्लोस यांनी सहभाग घेतला होता. चकली, करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळी या फराळांसह दिवाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पणत्या व अन्य साहित्य तसेच फळ प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
--
एकूण ७७ हजार ४७० रुपयांची विक्री
पाच दिवसांत एकूण ७७ हजार ४७० रुपयांची विक्री झाली आहे. यात सर्वाधिक विक्री हिरकणी प्रभाग संघाची ४१ हजार ५८५ रुपये एवढी झाली आहे. ओरोस अनमोल प्रभाग संघ यांची १५ हजार ९२० रुपये, कन्यारत्न संघाची ६ हजार ८४० रुपये, कुलस्वामिनी संघाची ५ हजार ७५ रुपये, स्वामी समर्थनगर येथील अनमोल संघाची २ हजार २५० रुपये, जिजामाता फळ प्रक्रिया केंद्राची ५ हजार ८०० रुपये विक्री झाली आहे. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या व्यक्तींकडून ही खरेदी करण्यात आली.