वराड-सोनवडेपार पुलाचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराड-सोनवडेपार पुलाचे काम सुरू
वराड-सोनवडेपार पुलाचे काम सुरू

वराड-सोनवडेपार पुलाचे काम सुरू

sakal_logo
By

59682
वराड ः वराड-सोनवडेपार पुलाचे सुरू करण्यात आलेले काम.

वराड-सोनवडेपार पुलाचे
रखडलेले काम अखेर सुरू

नीलेश राणेंचा प्रशासनाकडे पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः भाजप नेते नीलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कित्येक वर्षे रखडलेल्या वराड-सोनवडेपार पुलाचे काम सुरु झाले आहे.
गेली काही वर्षे केवळ आश्वासनांच्या हिंदोळ्यांवर असलेल्या या पुलाच्याबाबतीत स्थानिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नव्हते. याबाबत स्थानिकांनी भाजपा नेते माजी खासदार राणेंचे लक्ष वेधल्यानंतर १६ ऑक्टोबरला पंतप्रधान योजनेच्या अधिकाऱ्यांसहित पुलाची पाहाणी केली. तसेच लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना राणेंनी दिल्या होत्या. आज पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला लागणारी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन नीलेश राणेंनी दिले आहे. हा पूल कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल असून त्याचे बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केले जात आहे.