रत्नागिरीत रंगभूमी दिनी विशेष कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत रंगभूमी दिनी विशेष कार्यक्रम
रत्नागिरीत रंगभूमी दिनी विशेष कार्यक्रम

रत्नागिरीत रंगभूमी दिनी विशेष कार्यक्रम

sakal_logo
By

रंगभूमी दिनी
विशेष कार्यक्रम
रत्नागिरीः मराठी रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश पायऱ्यांवर प्रतिवर्षाप्रमाणे कार्यक्रम साजरा होणार आहे. या वर्षीपासून ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेची सभा राज्याचे उद्योगमंत्री तथा नाट्य परिषद शाखाध्यक्ष उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. संगीत रंगभूमीवर काम केलेले ज्येष्ठ रंगकर्मी परशुराम केळकर (सध्या कुवारबाव, मूळ मालगुंड) यांचा सन्मान नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे. या विशेष औचित्याने काही सादरीकरणे येथे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रवेश, रेकॉर्ड डान्स, नाट्यप्रवेश आदी प्रकारांतील मर्यादित सादरीकरण येथे होणार आहे. इच्छुकांनी वामन कदम, अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन नाट्य परिषदेच्यावतीने कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.
--------
पोस्टाद्वारे शुभेच्छापत्र
पाठविणाऱ्यांत घट
रत्नागिरी : ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.
-------
भ्रष्टाचार निर्मुलन
जनजागृती सप्ताह
रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्ट्राचार निर्मुलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मुलन बैठका घेण्यात येणार आहेत. कोणीही शासकिय, निमशासकिय अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुशांत चव्हाण, टोल फ्री नंबर- १०६४ यावर करण्याचे आवाहन या विभागाकडून केले आहे.