कणकवली : सक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सक्षिप्त
कणकवली : सक्षिप्त

कणकवली : सक्षिप्त

sakal_logo
By

जिल्हा मजूर फेडरेशनची मतदार यादी प्रसिद्ध
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्यादित फेडरेशनची निवडणूक लवकरच होणार असून याची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांनी प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप व हरकती लिखित सादर करण्यासाठी एक ते दहा नोव्हेंबर अशी मुदत दिली आहे. दाखल झालेले आक्षेप व हरकतीवर चौकशी करून निर्णय घेण्यासाठी २१ पर्यंत मुदत असून २५ ला संस्था मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

नरडवे रस्त्यावर खड्डे
कनेडी ः कनेडी ते नरडवे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. नाटळ, दिगवळे आणि नरडवे या गावांतून जाणाऱ्या राज्यस्तरीय सह्याद्री महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची बाजूपट्टी खचली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडी वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कणकवली रेल्वे पुलाखाली खड्डे
कणकवली ः शहरातील रेल्वेपुलाखाली खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पुलाखाली अंधार असल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. महिलांसाठी दुचाकी चालवणे धोकादायक झाले आहे. या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी कनकनगर रहिवाशांनी केली आहे.