संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान पाच साठी

कृषी विद्यापिठाच्या उपकुलसचिवपदी सुनील दुसाने

दाभोळ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या उपकुलसचिवपदी सुनीलकुमार पंडित दुसाने यांना बढती मिळाली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. दुसाने हे माजी सैनिक असून भारतीय नौदलातून पेटी ऑफिसर पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक पदापासून सेवेला सुरवात केली. त्यानंतर त्यांची सहाय्यक कुलसचिवपदी नियुक्ती झाली व सेवाजेष्ठतेनुसार त्यांना उपकुलसचिव पदावर बढती देण्यात आली. दुसाने यांनी कुलगुरू यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. ते माजी सैनिक असल्याने त्यांच्या कामाची सचोटी व शिस्त त्यांच्या कामतून दिसून येत आहे. कार्यालयीन कामात अतिशय तत्पर असणारे सुनील दुसाने यांनी तीन कुलगुरू यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर कोट्यवधींची उलाढाल

दाभोळ ः दापोली तालुक्यामध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर दुचाकी, फटाके, सोने यांची कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. दिवाळी, गुढीपाडव्याला वाहने, दागिन्यांची खरेदी प्राधान्याने केली जाते. दापोलीत दिवाळीत फटाके, सोने व दुचाकींची मोठी खरेदी झाली आहे. फटाक्यांची २ लाखांहून आधिक उलाढाल झाल्याचे फटाके विक्रेते प्रमोद पांगारकर यांनी सांगितले. ८० ते १०० गाड्यांची खरेदी झाली असून यातून १ कोटींच्यावर उलाढाल झाल्याचे सुनील रिसबूड यांनी सांगितले. दापोली तालुक्यात यावर्षी ५ ते ६ कोटींची उलाढाल झाल्याचे सोने विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या २ वर्षांनंतर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने व्यावसायिकांची दिवाळीही चांगली गेली आहे.


सानेगुरूजी विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय एकता दिवस

दाभोळ ः पूज्य सानेगुरूजी विद्यामंदिर, पालगड येथे सरदार वल्लभाई पटेल जयंतीच्या कार्यक्रमाचे व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या वेळी पालगडचे सरपंच अनिल बेलोसे, उपसरपंच गजानन दळवी, मंडळ निरीक्षक सुभाष आंजर्लेकर, तलाठी संतोष भोईर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत पालकर, प्रशांत बामणे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थिनी स्नेहा भोसले व शिक्षक प्रसाद पावशे यांनी सरदार पटेल यांच्या जीवनपटाची माहिती देणारी मनोगते व्यक्त केली. या वेळी सर्वांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. पूज्य सानेगुरूजी विद्यामंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय पालगडपर्यंतच्या या एकता दौडीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.


सुरक्षारक्षक नियुक्तीत स्थानिकांना डावलले

दाभोळ ः दापोली तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथे ग्रामपंचायतीने गावातील युवकांना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त न करता अन्य गावातील तरुणांना संधी दिल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाण्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सुरक्षारक्षक पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुरुड येथील दुर्गादेवी मंदिर व समुद्रालगत होणारी वाहतूककोंडी दूर करत आहेत; मात्र मुरुड ग्रामपंचायतीने गावातील युवकांना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त न करता अन्य गावातील तरुणांना संधी दिल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.