साळवी स्टॉपला बच्चेमंडळीनी साकारला लोहगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळवी स्टॉपला बच्चेमंडळीनी साकारला लोहगड
साळवी स्टॉपला बच्चेमंडळीनी साकारला लोहगड

साळवी स्टॉपला बच्चेमंडळीनी साकारला लोहगड

sakal_logo
By

( पान २ )

- rat१p९.jpg-
59678
रत्नागिरी ः साळवी स्टॉप येथील डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण सोसायटीत साकारलेला लोहगड किल्ल्याची प्रतिकृती.

साळवी स्टॉपला बच्चेमंडळीनी साकारला ‘लोहगड’
दिवाळी सुट्टीतील विद्यार्थ्यांचा उपक्रम ; कल्पकतेला दाद
रत्नागिरी, ता. १ ः शहरातील साळवी स्टॉप येथील डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण सोसायटीतील लहान मुलांनी लोहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. २० फूट लांब व सहा फूट उंच अशा आकाराचा हा किल्ला लक्षवेधी ठरला आहे.
शिवकालीन पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा, हा मुख्य हेतू आणि उद्देशाने डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण संस्थेच्या बच्चेमंडळींनी हा किल्ला साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नव्या पिढीला कळण्यासाठी येथील लहान मुलांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम सोसायटीमध्ये राबवण्यात आला. यासाठी सोसायटीच्या सर्व मुलांनी सलग १५ दिवस अथक मेहनत घेतली. दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुलांनी हा आनंद उपभोगला. लोहगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना किल्ल्याची मजबूत तटबंदी हुबेहूब साकारण्यात आली आहे. तोफखाना, किल्ल्यातील विहीर, शिवरायांचे आसनस्थान, शिक्षेसाठी असलेले टकमक टोक ही वैशिष्ट्य डोळ्यांचे पारणे फेडतात. कलागुणांना वाव मिळावा या भूमिकेतून हा किल्ला मुलांनी साकारला आहे. डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण संस्था या संस्थेतील लहान मुलांमध्ये एकजुटीची भावना यातून निर्माण होऊन दुर्लक्षित ऐतिहासिक गडकिल्ले सर्वांपर्यंत पोचाव्यात आणि आताच्या पिढीने त्या जतन करून ठेवाव्यात या भूमिकेतून हा किल्ला साकारला गेला आहे.
लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून सह्याद्रीच्या कडेकपारीत मावळ प्रांतात आहे. या किल्ल्याचे विशेष महत्व समजून भारत सरकारनेसुद्धा या किल्ल्याची राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यासाठी डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण सोसायटीतील शिवम ठसाळे, यश राऊत, श्रीपाद जाधव, सरोज चव्हाण, आयुष खरवतेकर, वेदांत कुबडे, आराध्य शारंगधर, सार्थक जगताप, श्रवण पाटील, सारंग कुळ्ये, साकार आंबुरे, साई तोडकर, समर्थ कांबळे आदी मुलांनी मेहनत घेतली आहे.