सैतवडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैतवडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह
सैतवडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह

सैतवडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह

sakal_logo
By

पान २

सैतवडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह

रत्नागिरी ः एस आय ग्रुप इंडिया, सेवा सहयोग फाउंडेशन आणि लोकजागर संस्था यांच्या सहयोगाने सैतवडे न्यू इंग्लिश स्कूल येथे बांधण्यात आलेल्या मुलींसाठीच्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे उद्घाटन व हस्तांतरण कार्यक्रम झाला. या वेळी एसआय ग्रुपचे अधिकारी सचिन आणेराव, विशाल देसाई, सतीश थुळ, समीर सय्यद व पदाधिकारी, संजय बैकर, अजय काताळे, मुख्याध्यापक अंगद मुठाळ, शिक्षक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सैतवडेसारख्या ग्रामीण भागात सुमारे ५ किलोमीटर परिसरातील सत्कोंडी, पन्हळी, वाटद, कोंडवाडी, मराठवाडा, जांभारी येथून मुले शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त व सुसज्ज स्वच्छतागृह एसआय ग्रुपतर्फे बांधण्यात आले आहे. सचिन अणेराव यांच्या हस्ते फित कापून व फलक अनावरण करण्यात आले. या ठिकाणी स्वच्छता विषयावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

फोटो
L59739
तंटामुक्ती अध्यक्षपदी कमलाकर जाधव

राजापूर ः तालुक्यातील हसोळतर्फ सौंदळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जांभवली, सोल्ये आणि हसोळ या गावांच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. जाधव यांचा मोठा जनसंपर्क आणि उत्तम कार्यसेवेची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. जांभवली ग्रामविकास मंडळाचे सचिव गजानन जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.


साखर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विधवा प्रथा बंद

राजापूर ः तालुक्यातील साखर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. यासाठी साखर ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी एक ग्रामसभा व प्रत्येक गावात एक सभा अशा ७ ते ८ सभा घेऊन ही प्रथा किती अनिष्ट आहे, हे सविस्तर समजून सांगितले. त्या माध्यमातून ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरपंच दशरथ मांजरेकर, रामचंद्र चव्हाण, मोहन भोसले, जयेश मांजरेकर, विशाखा मिरगुले, आकांक्षा मोंडे, सुप्रिया चव्हाण, सुचिता कांबळी, श्रुती मिरगुले, जगन्नाथ मिरगुले, सुधीर संखे, पोलिस पाटील रोहिदास कांबळी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.