किनार्‍यावरील परराज्यातील व्यक्तीची नोंद करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किनार्‍यावरील परराज्यातील व्यक्तीची नोंद करणार
किनार्‍यावरील परराज्यातील व्यक्तीची नोंद करणार

किनार्‍यावरील परराज्यातील व्यक्तीची नोंद करणार

sakal_logo
By

पान ३ वा ५

किनाऱ्यावरील परराज्यातील व्यक्तीची नोंद करणार

पोलिस अधीक्षक कुलकर्णी ; लँडिंग पॉइंटवर लक्ष ठेवू

रत्नागिरी, ता. १ ः जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याबरोबरच किनारा सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी लँडिंग पॉईंटवर लक्ष केंद्रित केले जाईल. मच्छिमारांसह किनारी भागातील नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे. किनारपट्टी परिसरात काम करणाऱ्या परराज्यातील किंवा अन्य भागातील व्यक्तीची नोंद पोलिस दलाकडे असलीच पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरी जिल्ह्याला १६० किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभाला आहे. त्यामुळे किनारी सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचा आहे. किनारी भागात मच्छिमारांची वस्ती अधिक आहे. मच्छिमार थेट समुद्रात वावरत असतात. त्यांना समुद्रासह किनारी भागातील हलचाली अधिक माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या मदतीने किनारी सुरक्षा भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. बाणकोट ते राजापूर या किनारी भागात असलेल्या सागरी पोलिस ठाण्यांना प्राधान्याने भेटी देणार आहोत. याची सुरवात जयगड, पूर्णगड, शहर पोलिस ठाण्यापासून केली आहे. समुद्रामार्गेही किनारपट्टीची पाहणी केली. सध्या ८ नौका पोलिसदलाच्या ताफ्यात आहेत. त्याच्या माध्यमातून गस्त घालण्यात येते. त्यामुळे किनारी भागातील लँडिंग पॉइंटवरील हालचालींवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सागरी सुरक्षा दलांना सतर्क करून त्यांना पोलिसदलाशी जास्तीत जास्त कसे कनेक्ट ठेवता येईल यावर विषेश भर दिला जाणार आहे. नेपाळमधून येणाऱ्या खलाशांची परिपूर्ण माहिती पोलिस ठाण्यांद्वारे संकलित केली जात आहे. त्यात अधिक सुस्पष्टता आणली जाणार आहे. किनारी भागात काम करणाऱ्या परराज्य, देशातील व्यक्तींची नोंद पोलिस दलाकडे असलीच पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्याचे अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
----------
.....कळंबटे...