राजापूर ग्रामीण रुग्णालयावर सर्वपक्षीय धडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ग्रामीण रुग्णालयावर सर्वपक्षीय धडकले
राजापूर ग्रामीण रुग्णालयावर सर्वपक्षीय धडकले

राजापूर ग्रामीण रुग्णालयावर सर्वपक्षीय धडकले

sakal_logo
By

rat1p13.jpg
59727
राजापूरः राजापूर ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींबाबत डॉ. मंगला चव्हाण यांना निवेदन देताना अ‍ॅड. शशिकांत सुतार, अ‍ॅड. जमीर खलिफे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व तरुण कार्यकर्ते.

राजापूर रुग्णालयावर सर्वपक्षीय धडकले
सेवाबाबत नाराजी ; सोयीसुविधांच्या पूर्ततेची वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ः शहरातील ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य सेवासुविधांच्या उपलब्धतेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची होणाऱ्या गैरसोयीबाबत आज सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व तरुणांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयावर धडक दिली. या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर केले. रुग्णालयाची सेवा सुधारणा आणि सोयीसुविधांची पूर्तता व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, अपुरा औषधसाठा व एक्स-रे, सोनाग्राफीसह अन्य सुविधा नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे तर कधी कधी रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी वा अन्य ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होते. गर्भवती महिलांचीही मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील या स्थितीबाबत आज शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांनी एकत्रित येत या विरोधात ग्रामीण रुग्णालयावर धडक दिली. या वेळी राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, हनिफ मुसा काझी, माजी नगरसेवक संजय ओगले, विनय गुरव, सौरभ खडपे, दिनानाथ कोळवणकर, सुशांत मराठे, शिवसेना शहरप्रमुख संजय पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, राष्ट्रवादीचे संतोष सातोसे यांनी रुग्णालयातील गैरसोयी, रुग्णांची होणारी परवड याबाबतची कैफियत मांडली. त्याचवेळी रुग्णालयाच्या गलथान कारभारासह अपुर्‍या सोयीसुविधांचा सर्वसामान्यांनी फटका बसत असल्याचेही नमूद करण्यात आले.
या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी चव्हाण यांनी रुग्णालयातील गैरसोयींसह रिक्त असलेली विविध पदे आणि अपुर्‍या असलेल्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. अपुर्‍या सोयीसुविधा असतानाही रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. अपुर्‍या सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण सार्‍यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांनी या वेळी केली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वपक्षीय सोयीसुविधा उपलब्धतेच्यादृष्टीने प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आश्‍वासित केले.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर,कल्याणी रहाटे, विजय गुरव, रूपेश साखरकर, दिलीप आरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुडदे, डॉ. महेश गोलकादे आदी उपस्थित होते