''सामाजिक बांधिलकी''तर्फे मोफत नेत्र चिकित्सा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सामाजिक बांधिलकी''तर्फे
मोफत नेत्र चिकित्सा उपक्रम
''सामाजिक बांधिलकी''तर्फे मोफत नेत्र चिकित्सा उपक्रम

''सामाजिक बांधिलकी''तर्फे मोफत नेत्र चिकित्सा उपक्रम

sakal_logo
By

59755
सावंतवाडी ः डॉ. धुरी यांच्याशी चर्चा करताना ‘सामाजिक बांधिलकी’चे पदाधिकारी.

‘सामाजिक बांधिलकी’तर्फे नेत्र चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः सामाजिक बांधिलकी सावंतवाडी या संघटनेने शासकीय योजनेतून डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया हा उपक्रम हाती घेतला आहे. मोतिबिंदू किंवा अन्य नेत्र विकार असलेल्या रुग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे रवी जाधव यांनी केले आहे.
संबंधित रुग्णास चिकित्सेपासून शस्त्रक्रियेपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार आहे. रुग्णासोबत एक नातेवाईक असणे गरजेचे आहे. त्याआधी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत्रचिकित्सा मंगळवार व शुक्रवार सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात २२४ नेत्ररुग्णांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य जिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या,अशी माहिती नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. शुभजीत धुरी यांनी दिली. तसेच सावंतवाडी शहरातील दोन वयोवृद्धांना ‘सामाजिक बांधिलकी’च्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. शहरात व आजूबाजूच्या गावांमध्ये मोतीबिंदूचे रुग्ण असल्यास त्यांनी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, ''सामाजिक बांधिलकी''चे रवी जाधव, समीर वंजारी, संजय पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.