शिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडीवासीयांची लवकरच 
दूषित पाण्यापासून सुटका
शिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका

शिवडीवासीयांची लवकरच दूषित पाण्यापासून सुटका

sakal_logo
By

शिवडीवासीयांची लवकरच
दूषित पाण्यापासून सुटका
शिवडी, ता. १ ः शिवडी गाडी अड्डा विभागातील नागरिकांची दूषित पाण्यापासून लवकरच सुटका होणार आहे. पालिकेकडून येथील समस्‍येवर कायमस्‍वरुपी तोडगा निघे पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका येथील दूषित पाण्याच्‍या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना अजूनही पूर्णपणे यश लाभलेले नाही. या विभागात मंगळवारी (ता. १) एम.एम.आर.डी.ए. तसेच मुंबई महापालिका एफ दक्षिण विभाग जलविभाग, महापालिका कन्स्ट्रक्शन विभाग यांच्यासोबत माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जोपर्यंत येथील नागरिकांच्या दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग निघत नाही तोपर्यंत येथील नागरिकांना दुसऱ्या जलवाहिनी वरून स्वच्छ पाणी पुरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी होणारा खर्च करण्यास एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी तयारी दर्शिवली. यावेळी पालिका तसेच एमएमआरडीएचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.