कांदिवलीत बेघरांचे चौकात बस्तान; पालिकेकडून दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत बेघरांचे चौकात 
बस्तान; पालिकेकडून दुर्लक्ष
कांदिवलीत बेघरांचे चौकात बस्तान; पालिकेकडून दुर्लक्ष

कांदिवलीत बेघरांचे चौकात बस्तान; पालिकेकडून दुर्लक्ष

sakal_logo
By

कांदिवलीत बेघरांचे चौकात
बस्तान; पालिकेकडून दुर्लक्ष

स्‍थानिकांचा आरोप; कारवाईची मागणी

कांदिवली, ता. १ ः कांदिवली पश्चिम येथे लाखो रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आलेल्या ‘लव कांदिवली’ चौकात अज्ञात समाजाने व्‍यक्‍तींनी बस्‍तान मांडले आहे. या व्‍यक्‍तींनी चौकाची घाण करून दयनीय अवस्था केली आहे. याकडे पालिका, वाहतूक विभाग आणि पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. दरम्‍यान याचा त्रास प्रवाशांसह वाहनचालकांना करावा लागत आहे.
कांदिवली पश्चिमेला नगरसेवक निधीतून बाळासाहेब देवरस सिग्नल चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले. तेथे लावलेले ‘लव कांदिवली’ नाव नागरिकांसह प्रवासी आणि वाहनचालकांसाठी आकर्षण ठरले आहे. मात्र गेले काही महिन्यांपासून अज्ञात व्‍यक्‍तींनी तेथे बस्तान मांडले आहे. चौकाच्या तीनही बाजूंनी चुल पेटवून भर रस्त्यात जेवण, झोपणे आणि नैसर्गिक विधीसह दैनंदिन व्यवहारात करण्यात येत असतात. त्‍यांची लहान मुले तेथेच खेळतात. तसेच सिग्नलला वाहने उभी राहताच बायका, मुले काचेवर हात मारून भीक मागतात. चौकाच्या जाळ्यांवर, कठड्यावर कपडे, चादरी अवास्तव टाकतात. दयनीय अवस्था झालेल्या चौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. चौकासह मार्गावरच बिंदास्तपणे वावरत असलेल्या समाजाकडे पोलिस, वाहतूक विभाग आणि पालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
----
कोट
पालिकेने त्यांच्यावर वारंवार करवाई केली आहे. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा बस्तान मांडतात. अधिकाऱ्यांना सांगुन कारवाई करण्यात येईल.
- संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर/दक्षिण