देवगड अर्बनसह मजूर संघाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड अर्बनसह मजूर संघाच्या
निवडणुकीसाठी हालचाली सुरू
देवगड अर्बनसह मजूर संघाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू

देवगड अर्बनसह मजूर संघाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू

sakal_logo
By

देवगड अर्बनसह मजूर संघाच्या
निवडणुकीसाठी हालचाली सुरू

प्रारूप मतदार याद्या जाहीर; अंतिम मतदार यादी २५ नोव्हेंबरला

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा जिल्हा संघ आणि दि देवगड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक या संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज या दोन्ही संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात जाहीर केल्या आहेत. दोन्ही संस्थांची अंतिम मतदार यादी २५ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
जिल्ह्यातील ब वर्गात असलेल्या सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका जिल्हा सहकारी संस्था कार्यालयाकडून घेण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यातील मालवण, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग व वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघांच्या निवडणुका सुरू आहेत. कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता देवगड अर्बन बँक आणि जिल्हा मजूर संघ या दोन संस्थांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात आज जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार देवगड अर्बन बँकेसाठी ११ हजार ५०० मतदार निश्चित झाले आहेत. यात देवगड तालुक्यातील ९ हजार ६९७ मतदार आहेत. देवगड तालुक्याबाहेरील एक हजार ८०३ मतदार आहेत. देवगड तालुक्यातील मतदारांची यादी देवगड अर्बन बँक व सहकारी संस्था कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यासाठी कणकवली सहकारी संस्था कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या पाच तालुक्यांसाठी कुडाळ येथील सहकारी संस्था कार्यालयात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेची सुद्धा प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप यादीत ८७ मतदार संस्था निश्चित झाल्या आहेत. दरम्यान, प्रारूप यादीवर हरकत घेण्याची मुदत १० नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आली असून त्यावर निर्णय २१ नोव्हेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे. तर अंतिम यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे यांनी दिली.