पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे मागितल्याच्या 
रागातून मारहाण
पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

sakal_logo
By

पैसे मागितल्याच्या
रागातून मारहाण
सावंतवाडी, ता. १ ः कामाचे पैसे मागत शिविगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय ठेकेदाराने कामगाराला घरात घुसून मारहाण केल्याची घटना काल (ता.३१) रात्री ८ च्या सुमारास सालईवाडा परिसरात घडली. या मारहाणीत अखिलेश धरमदेव तिवारी (वय ३८, मूळ रा. बिहार) याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर संशयित विजयकुमार संतराम चौधरी (मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. माजगाव नाला) याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिवारी हा संशयित चौधरी याच्याकडे कामाला होता. दरम्यान, आपण केलेल्या कामाचे चौधरी हा पैसे देत नसल्यामुळे रागातून तिवारी याने त्याला शिवीगाळ केली. हाच राग मनात ठेवून चौधरी याने जखमी तिवारीचे घर गाठत त्याला लाकडी रिपीने मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तिवारी याने दिलेल्या तक्रारीनुसार चौधरी याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात महाराणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.