सिंधुदुर्ग तिसऱ्यांदा कोरोनामुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग तिसऱ्यांदा कोरोनामुक्त
सिंधुदुर्ग तिसऱ्यांदा कोरोनामुक्त

सिंधुदुर्ग तिसऱ्यांदा कोरोनामुक्त

sakal_logo
By

सिंधुदुर्ग तिसऱ्यांदा कोरोनामुक्त

शून्य रुग्णसंख्या ः तिघा रुग्णांना घरी सोडले

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा २६ मार्च २०२० नंतर ८ एप्रिल २०२२ ला पहिल्यांदा कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळी २० एप्रिल २०२२ ला पुन्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने शिरकाव केल्याने जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या झाली होती. आज तिसऱ्या वेळी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सक्रिय असलेल्या तीन रुग्णांची तब्येत ठीक असल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण मिळाला होता. त्यानंतर ही संख्या पुढे वाढत गेली. गेली दोन वर्षे दहा महिन्यांत जिल्ह्यात ५८ हजार ३०७ कोरोना बाधित रुग्ण मिळाले. यातील ५६ हजार ७६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर १ हजार ५४२ रुग्णांचे निधन झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ५२ हजार ६७६ एवढ्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर ३ लाख ४७ हजार ७९, तर अँटिजन टेस्ट ३ लाख ५ हजार ५९७ आहेत. बाधितांमध्ये आरटीपीसीआरमध्ये ४१ हजार ७५१ बाधित मिळाले आहेत. तर अँटिजनमध्ये १६ हजार ६८० बाधित मिळाले आहेत.
जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने शिरकाव केल्यानंतर सक्रिय रुग्ण कायम राहिले होते. एकदाही हा आकडा झिरो झाला नव्हता. तिसऱ्या लाटेतील शिल्लक सक्रिय राहिलेल्या तीन रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. तिसऱ्या वेळी जिल्हा कोरोनामुक्त होत असताना जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कुडाळ तालुक्यात १२ हजार ५८ एवढे मिळाले असून सर्वाधिक मृत्यू कणकवली तालुक्यात ३२३ एवढे झाले. कणकवली तालुक्यात १० हजार ७०६ रुग्ण मिळाले, तर कुडाळ तालुक्यात मृत्यू संख्या २५६ राहिली आहे. मालवण तालुक्यात ८ हजार ३२८ रुग्ण मिळाले, तर ३०१ मृत्युमुखी पडले. सावंतवाडी तालुक्यात ८ हजार ६९० रुग्ण मिळाले असून मृत्यू संख्या २१७ राहिली आहे. देवगड तालुक्यात मृत्यू संख्या १८६ असून बाधित संख्या ७ हजार २९ राहिली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ५ हजार २३८ बाधित असून ११८ मृत्यू आहेत. वैभववाडी तालुक्यात २ हजार ५७९ बाधित आणि ८४ मृत्यू, तर दोडामार्ग तालुक्यात ३ हजार ३३८ बाधित आणि ४८ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याबाहेरील बाधित संख्या ३४१ असून ९ मृत्यू आहेत.