rat0140_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat0140_txt.txt
rat0140_txt.txt

rat0140_txt.txt

sakal_logo
By

(पान ३ साठी)


rat१p१६.jpg-


(चोरीतील रक्कम मुळ मालकाला देताना जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी सोबत अन्य अधिकारी.)
-----
59783

रेल्वेत चोरीतील २७ लाख मालकाला परत

रत्नागिरी पोलिसांची कामगिरी ; ४८ तासात गुन्ह्याचा तपास

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः रेल्वेच्या जामनगर तिरुवल्ली एक्स्प्रेसमधून २७ लाख ८६ हजार रुपयांची चोरी झाली होती. त्याचा यशस्वी तपास करून हस्तगत केलेला चोरीतील मुद्देमाल पोलिस दलाकडून मुळ मालकांना परत करण्यात आला.

प्रशांत भिमराव माने (वय ३९, रा. मासेरणे, ता. खटाव, जि. सातारा) हे १ मे २०२२ ला तिरुवल्ली एक्स्प्रेस या रेल्वेने प्रवास करत होते. माने यांच्याकडील २७ लाख ८६ हजार रूपये रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान चोरीस गेले होते. माने यांनी याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक डॉ. गर्ग, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनित चौधरी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, आकाश साळुंखे व प्रकटीकरण पथकाने अवघ्या ४८ तासात गुन्ह्याचा छडा लावला. या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रोख रक्कमेसह पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. हे सहा संशयित केरळ राज्यासह सांगली, विटा येथील असल्याची माहिती पुढे आली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी जप्त रक्कम न्यायालयात सादर केली होती. १ नोव्हेंबरला ही रक्कम मुळ मालकांना परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ही रक्कम प्रशांत माने यांच्या ताब्यात दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी उपस्थित होते.