कणकवलीला २३ कोटींचा निधी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीला २३ कोटींचा निधी मिळणार
कणकवलीला २३ कोटींचा निधी मिळणार

कणकवलीला २३ कोटींचा निधी मिळणार

sakal_logo
By

59623
कणकवली ः नगराध्यक्ष दालनात समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी नगरपंचायतीला मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती दिली. यावेळी अभिजित मुसळे, किशोर राणे, महेश सावंत, संजय कामतेकर.


कणकवलीला मिळणार २३ कोटी
नगराध्यक्षांची माहिती; शिंदे-फडणवीस सरकारने दिली मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ ः महाविकास आघाडीने कणकवली शहराच्या विकासाची अनेक कामे अडवून ठेवली होती; मात्र राज्‍यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरकारने कणकवली नगरपंचायतीला तब्‍बल २३ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्‍याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आज दिली. येथील नगराध्यक्ष दालनात नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, किशोर राणे, महेश सावंत आदी उपस्‍थित होते.
नलावडे म्‍हणाले, ‘‘कणकवलीच्या अनेक विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मागील सरकारच्या काळात हेतूपुरस्सर कणकवली नगरपंचायतला विकासकामांचा निधी देणे डावलले जात होते. या अनुषंगानेही या भेटीमध्ये चर्चा झाली. कणकवलीतील रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५ कोटी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर नागरी सुविधा योजनेंतर्गत अजून स्वतंत्रपणे पाच कोटींचा निधी द्या, अशी मागणी देखील आमदार राणेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. कणकवली नगरपंचायतचा मंजूर असलेला स्टाफ पॅटर्नबाबत देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. मंजूर दहापैकी जवळजवळ दोनच पदे सध्या नगरपंचायतमध्ये कार्यरत आहेत. आठ पदे रिक्त असल्यामुळे त्याचा कणकवली नगरपंचायतच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. स्टाफ पॅटर्नबाबतही योग्य ती कार्यवाही तातडीने करा व तातडीने प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी द्या, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍या.’’
ते पुढे म्‍हणाले, ‘‘राज्याचे पर्यावरण मंत्री लोढा यांची देखील भेट घेत चर्चा करण्यात आली. यामध्ये पर्यटन विकासदृष्ट्या कणकवली शहर विकसित करण्यासोबत चर्चा करत असताना कणकवली शहरातील २७ आणि २८ क्रमांकाचे आरक्षण विकसित करण्याकरिता अजून १० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. टप्पा १ विकसित केले असले, तरी अजून दोन टप्प्यांमधील काम बाकी आहे. याकरिता १० कोटींचा निधी द्या, अशी देखील मागणी या वेळी करण्यात आली. कणकवली गणपती साणा येथे धबधब्याचा मंजूर करण्यात आलेला प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्यात आले. या कामाकरिता अडीच कोटी रुपयांचा निधी व २७ आणि २८ आरक्षणमधील गार्डनच्या कामाकरिता ८० लाखांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीतून तातडीने मंजुरी द्या, अशी चर्चा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. तसा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.’’

दिवाळी भेट
आमदार राणेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांमार्फत या निधीला ४ नोव्हेंबरच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार असल्याचे हर्णे म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एकूण २३ कोटी २० लाखांची दिवाळी बंपर भेट कणकवलीवासीयांना या बैठकीतून मिळाल्याची माहिती हर्णे व नलावडे यांनी दिली.