आमदार जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार जाधव यांना
अटकपूर्व जामीन मंजूर
आमदार जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

आमदार जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

sakal_logo
By

आमदार जाधव यांना
अटकपूर्व जामीन मंजूर

ओरोस, ता. १ ः उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना येथील जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची नोटीस पाठविण्यात आल्याने त्यांच्या समर्थनार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उपस्थित जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. विशेषतः केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. परिणामी भाजपचे कुडाळ अध्यक्ष दादा साईल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जनसमुदायास संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला बाधा होईल व त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होईल, अशा रीतीने अर्वाच्य भाषेत तसेच भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडीचे घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ व संघर्ष निर्माण होईल, असे भाषण केल्याने भा. दं. वि. कलम १५३, ५०५(१)(क), ५००, ५०४ अन्वये कुडाळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. अटक होऊ नये, यासाठी जिल्हा न्यायालयात जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी होत न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.