स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या!
स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या!

स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या!

sakal_logo
By

59814
वझरे ः वेदांता कोक कंपनीच्या समोर सरपंच लक्ष्मण गवस यांच्यासह इतरांनी छेडलेले उपोषण.


स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या!

वझरेतील मागणी; ‘वेदांता’समोरच उपोषण

दोडामार्ग, ता.१ ः पोट वाहतूक ठेकेदार नेमण्याऐवजी स्थानिकांनाच थेट ठेक्याचे पैसे द्या, स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या, ज्या गाड्या काम न देता बाहेर उभ्या ठेवल्यात त्यांना काम द्या आदी मागण्यांसाठी वझरे येथील वेदांता कोक कंपनीच्या समोर सरपंच लक्ष्मण गवस आणि अन्य ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापन आणि आंदोलनकर्ते यांच्यात झालेल्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने उपोषण अजूनही सुरू आहे. उपोषणात गवस यांच्यासह अमर नाईक, योगेश महाले, गुरुदास साखळकर आदींचा सहभाग आहे.
कंपनीच्या आतील भागातील कोळसा वाहतूक करण्यासाठी जी अवजड वाहने वापरली जातात, त्याचे पैसे कंपनी एका वाहतूक ठेकेदाराला देते. त्याने दुसरा पोट ठेकेदार नेमला आहे. तो नंतर वाहन मालकांना देतो. दोन ठेकेदार आपापला हिस्सा काढून घेत असल्याने प्रत्यक्षांत वाहनमालकाच्या हातात किरकोळ रक्कम येते. त्यात चालकाचा खर्च आणि वाहनांची दुरुस्ती देखभालही करता येत नाही. त्यामुळे तोट्यात वाहने चालवण्याऐवजी कंपनीने ठेकेदारांऐवजी वाहतूक भाडे थेट आम्हालाच द्यावे अशी त्यांची मागणी आहे. तसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेणे, स्थानिकांच्या विनावापर ठेवलेल्या गाड्या वापरून त्यांना त्यांची रक्कम आदा करावी अशी मागणी त्यांची आहे. तालुक्यातील आणि वझरेतील अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाबूराव धुरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी आदींनी उपोषणाला भेट देऊन कंपनी प्रशासनाशी झालेल्या चर्चेतही भाग घेतला.