वाशिष्ठी डेअरी प्रकल्प घरात लक्ष्मी आणेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प घरात लक्ष्मी आणेल
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प घरात लक्ष्मी आणेल

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प घरात लक्ष्मी आणेल

sakal_logo
By

59875
rat2p5.jpg ः
खेड ः वेरळ येथे दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करताना सुभाषराव चव्हाण. शेजारी संजयराव कदम, बाबाजी जाधव, प्रशांत यादव.
--------------
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प घरात लक्ष्मी आणेल
संजय कदम ; वेरळ, चिंचघरीत संकलन केंद्राचे उद्घाटन
चिपळूण, ता. २ ः चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथिल वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रकल्पामुळे तळागाळातला शेतकरी नव्याने उभा राहणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारा हा प्रकल्प आहे, असा विश्वास खेडचे माजी आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यातील वेरळ आणि चिंचघर-दस्तुरी येथे मंगळवारी (ता. १) सकाळी वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या दुग्धप्रकल्पाच्या दूध संकलन केंद्रांचे उद्घाटन झाले. माजी आमदार संजय कदम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आदींच्या उपस्थितीत या दोन्ही संकलन केंद्रांचे उद्घाटन झाले. त्यावेळी श्री. कदम म्हणाले, नवी पिढी दुधाच्या व्यवसायात उभी राहील की नाही, यात शंका होती; मात्र वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मोठ्या धाडसाने वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या पाठिशी आपण ठामपणे उभे राहायला हवे.
सुभाषराव चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक ताकद द्यायची असेल तर दुग्ध व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. शासकीय दूध योजनांची अवस्था बिकट झाल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण शेतकरी अडचणी येऊ नये यासाठीच वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच संकलन केंद्रे सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या या प्रकल्पाच्या पाठिशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहूया.
प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची आणि प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली. वेरळ आणि चिंचघर-दस्तुरी येथील दूध संकलन केंद्राच्या उद्घाटनाला चिंचघर-दस्तुरीचे सरपंच मधुकर कदम, रमेश चव्हाण, मामा जाधव, अरुण पवार, स. तु. कदम, मंगेश गोंधळेकर, वैभवी घाडगे, सुनील जड्याळ, सिद्धी पवार, रवींद्र भोसले, सत्यवान म्हामुणकर, सोमा गुढेकर आदी उपस्थित होते.
------------
चौकट
दर्जेदार दूध उत्पादकांना बोनस
वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यात अनेक सुविधा दिल्या जातील. हा प्रकल्प, हे संकलन केंद्र माझे आहे, माझ्या हितासाठी आहे, असा विचार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार दुधाचे उत्पादन घ्यावे. अशा दर्जा टिकवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून बोनस दिला जावा, अशी सूचनाही या वेळी सुभाषराव चव्हाण यांनी केली.