बांद्यातील आजारग्रस्तास नाभिक संघटनेतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यातील आजारग्रस्तास
नाभिक संघटनेतर्फे मदत
बांद्यातील आजारग्रस्तास नाभिक संघटनेतर्फे मदत

बांद्यातील आजारग्रस्तास नाभिक संघटनेतर्फे मदत

sakal_logo
By

59878
बांदा ः प्रसाद बांदेकर यांना मदत सुपूर्द करताना नाभिक संघटनेचे पदाधिकारी.

बांद्यातील आजारग्रस्तास
नाभिक संघटनेतर्फे मदत

ओटवणे, ता. २ ः बांदा निमजगा येथील नाभिक बांधव प्रसाद बांदेकर यांना बांदा नाभिक विभाग संघटनेतर्फे पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेने केलेल्या मदतीमुळे पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
बांदेकर हे गेले अनेक महिने दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्यांच्या आजारासाठी तीन लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्ची पडली. घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. मोलमजुरी करून ते गुजराण करीत होते; मात्र आजारामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. याबाबत माहिती मिळताच समाजबांधवाला मदत करण्यासाठी खारीचा वाटा उचलत बांदा नाभिक संघटनेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. अधिक मदत मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येथील, असे आश्वासनही बांदा नाभिक संघटनेचे अध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष नंदू कदम, गणपत चव्हाण, दिनेश शेर्लेकर, संतोष बांदेकर, विश्वनाथ शेर्लेकर, प्रकाश चव्हाण, कुमार हडपत आदी उपस्थित होते.