‘ऑफलाईन’ धान्य द्या, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ऑफलाईन’ धान्य द्या, अन्यथा आंदोलन
‘ऑफलाईन’ धान्य द्या, अन्यथा आंदोलन

‘ऑफलाईन’ धान्य द्या, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

59879
विजय प्रभू

‘ऑफलाईन’ धान्य द्या, अन्यथा आंदोलन

विजय प्रभू; गोरगरिबांचे हाल, प्रशासनास इशारा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः ज्यांना ऑक्टोबरचे धान्य मिळाले नाही, तसेच नोव्हेंबरच्या धान्यासाठी ज्यांची ‘ऑनलाईन’ नोंदणी झाली नाही, त्यांना आणि पुढे सर्व्हरचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत ‘ऑफलाईन’ धान्य वितरित केले जावे; अन्यथा अन्यायग्रस्त जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेंडोली सोसायटीचे अध्यक्ष व काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू यांनी दिला आहे.
प्रभू यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, रेशनवर ‘ऑनलाईन’ धान्य दिले जाते. सध्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे अंगठा लावून ग्राहकांची ‘ऑनलाईन’ नोंदणी होण्यात अडचणी येत आहेत. ‘ऑनलाईन’ नोंदणी करण्यासाठी लोक दूरून पायपीट करत येतात, तासन्‌तास थांबतात. यात पैशांचा आणि वेळेचा अपव्यय होतो आणि एवढे करूनही ‘ऑनलाईन’ नोंदणी होत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना दिवाळीत हक्काचे धान्य मिळाले नाही. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ ‘ऑफलाईन’ वितरीत केला. मग येथील सर्व्हर डाऊन असेल, तर ‘आनंदाचा शिधा’प्रमाणे दर महिन्याचे धान्य का वितरीत केले जात नाही? सर्व्हर डाऊनमुळे आपला कामधंदा सोडून लोकांना वारंवार रेशन दुकानावर हेलपाटे मारून त्रास करून घ्यावा लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकारीही सांगतात. त्यामुळे ‘ऑफलाईन’ पद्धतीने धान्य वितरीत करण्याचा निर्णय हा धोरणात्मक असून सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे.
--
काहीजण ‘खोके’ मोजण्यात व्यस्त
सध्या सरकारमध्ये असलेले ‘खोके’ मोजण्यात व स्वतःच्या अस्तित्वाच्या राजकारणात व्यस्त असून गोरगरीब जनतेकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे शासनाने ज्यांना ऑक्टोबरचे धान्य मिळाले नाही, तसेच नोव्हेंबरच्या धान्यासाठी ज्यांची ‘ऑनलाईन’ नोंदणी झाली नाही, त्यांना आणि पुढे सर्व्हरचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ‘ऑफलाईन’ धान्य वितरीत केले जावे; अन्यथा अन्यायग्रस्त जनतेला सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रभू यांनी दिला.