महामार्ग बनतोय ‘पार्किंग हब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग बनतोय ‘पार्किंग हब’
महामार्ग बनतोय ‘पार्किंग हब’

महामार्ग बनतोय ‘पार्किंग हब’

sakal_logo
By

59884
कुडाळ ः येथे मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल राजसमोर आठ ते दहा दिवसांपासून उभा असलेला ट्रक.

महामार्ग बनतोय ‘पार्किंग हब’

यंत्रणेचे दुर्लक्ष; वाहतुकीसाठी ठरतोय अडथळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः मुंबई-गोवा महामार्गावर सध्या अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. अगदी खारेपाटण ते झाराप या सिंधुदुर्गातील टप्प्यात महामार्गावर अनधिकृत पार्किंग दिसून येते. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव वाहतुकीवर होत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून खारेपाटण ते सिंधुदुर्ग हा प्रवास वेगवान झाला आहे. यामुळे सुविधांमध्ये भर पडण्याबरोबरच वेळेची बचतही होत आहे; मात्र कामातील त्रुटी, वेगावरील अनियंत्रण व इतर कारणांमुळे अपघातांची संख्याही लक्षणिय आहे. यातच अनधिकृत पार्किंगचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या पूर्ण मार्गावर अनेकदा अनोळखी वाहने दीर्घकाळासाठी उभी करुन ठेवली जातात. विशेषतः शहरी भागाजवळ हे प्रकार जास्त घडत आहेत. ही वाहने नेमकी कोणत्या कारणाने उभी आहेत? यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत नाही. अनेकदा ही वाहने वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनतात. महामार्गावर मध्यरात्री-पहाटे लांबपल्ल्याची वाहने धावत असतात; पण महामार्गावर असणारी लाईट सेवा मात्र पहाटे ४ पर्यंतच सुरु असते. ती कमीतकमी पहाटे ६ वाजेपर्यंत तरी सुरु असणे आवश्यक असते; मात्र असे होताना दिसून येत नाही. यामुळे महामार्गावर भीषण अपघात घडू शकतात. या समस्यांकडे यंत्रणेने गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
------------
चौकट
‘त्या’ ट्रकचे गुढ
शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावर हॉटेल राजसमोर गेले ८ ते १० दिवस एक ट्रक पार्क केला आहे; पण या ट्रकबाबत नक्की काय घडलंय? तो कशासाठी उभा आहे? याबाबत प्रशासनाला चौकशीची साधी गरजही वाटत नाही. हा ट्रक नादुरुस्त झाला असेल तर त्याच्या वाहनचालकाने ट्रक पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी उभा करणे आवश्यक होता; पण हा ट्रक आता अन्य वाहनांसाठी धोकादायक बनला आहे.