‘नॅब’च्या रुग्णालयासाठी फेडरल बॅंकेकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नॅब’च्या रुग्णालयासाठी
फेडरल बॅंकेकडून मदत
‘नॅब’च्या रुग्णालयासाठी फेडरल बॅंकेकडून मदत

‘नॅब’च्या रुग्णालयासाठी फेडरल बॅंकेकडून मदत

sakal_logo
By

59882
सावंतवाडी : ‘नॅब’चे अनंत उचगावकर यांना धनादेश सुपूर्द करताना फेडरल बॅंकेचे पदाधिकारी.

‘नॅब’च्या रुग्णालयासाठी
फेडरल बॅंकेकडून मदत
सावंतवाडी, ता. २ ः नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड, सिंधुदुर्ग ही अंधांसाठी कार्यरत असलेली संस्था येथील भटवाडी येथे भव्य व सर्व आधुनिक सोयींनीयुक्त असे नेत्र हॉस्पिटल उभारत आहे. हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाला आले आहे. फेडरल बॅंकेच्या सावंतवाडी शाखेतर्फे या हॉस्पिटलसाठी सोलार सिस्टीम पुरस्कृत करण्यात आली. याकरिता फेडरल बॅंक सावंतवाडी शाखेतर्फे २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. फेडरल बॅंकेचे गोवा क्लस्टर हेड सुनील नाईक, सावंतवाडीचे शाखाधिकारी योगेश सावंत यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश नॅब संस्थेकडे प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, कोषाध्यक्ष भालचंद्र ऊर्फ आबा कशाळीकर यांनी हा चेक स्वीकारला. या वेळी स्नेह नागरी पतसंस्थेच्या मुख्याधिकारी संगीता प्रभू उपस्थित होत्या.