राजापुरातील आजचा आठवडाबाजार रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरातील आजचा आठवडाबाजार रद्द
राजापुरातील आजचा आठवडाबाजार रद्द

राजापुरातील आजचा आठवडाबाजार रद्द

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

राजापुरातील आजचा आठवडाबाजार रद्द

रस्ता कामामुळे निर्णय ; व्यापारी, नागरिकांना आवाहन

राजापूर, ता. २ ः तालिमखाना ते जवाहर चौक रस्त्याचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक शिवाजीपथमार्गे वळवण्यात आल्याने वाहतुकीच्यादृष्टीने अधिक सोयीचे व्हावे म्हणून शहरामध्ये गुरुवारी (ता. ३) भरणारा आठवडा बाजार रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. व्यापाऱ्यांसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
खड्डेमय बनल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असलेला आणि विविध कारणांमुळे रेंगाळत असलेला तालिमखाना ते जवाहरचौक रस्त्याच्या कामाला गेल्या दोन दिवसांपासून धुमधडाक्यात सुरवात झाली आहे. या रस्त्याच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि रस्त्याचे दर्जेदार काम व्हावे या उद्देशाने या रस्त्यावरील वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याऐवजी शहरातील वाहतूक शिवाजी पथमार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गावरील बंदरधक्का परिसरामध्ये दर गुरुवारी शहरातील आठवडा बाजार भरतो. या ठिकाणी आठवडा बाजार भरल्यास या मार्गावरून चालणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांसह राजापूरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.