बांद्यात किल्ले स्पर्धेत शिवानंद परब प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात किल्ले स्पर्धेत 
शिवानंद परब प्रथम
बांद्यात किल्ले स्पर्धेत शिवानंद परब प्रथम

बांद्यात किल्ले स्पर्धेत शिवानंद परब प्रथम

sakal_logo
By

59901
59902
59903
59904
59905
बांदा ः स्पर्धेतील विजेत्या किल्ल्यांच्या प्रतिकृती.

बांद्यात किल्ले स्पर्धेत
शिवानंद परब प्रथम
बांदा, ता. २ ः ज्येष्ठ नागरिक संघ बांदातर्फे दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दीपावली किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बांदा शहर मर्यादित घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धकांनी सहभाग घेतला.
२८ व २९ ऑक्टोबरला स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अनुक्रमे शिवानंद परब (आंगडीवाडी), श्लोक बहिरे (निमजगा), उत्कर्ष शेटकर (गवळीटेंब) यांनी प्रथम तीन, तर उत्तेजनार्थ साईशा केसरकर (उभाबाजार), नावीन्य म्हाडगुत (देऊळवाडा) यांना मिळाला. स्पर्धेचे परीक्षण अमित कुबडे, स्वप्नील गडकरी यांनी केले. लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सांगण्यात आले.