प्रत्‍येकाला कायद्याची माहिती हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्‍येकाला कायद्याची माहिती हवी
प्रत्‍येकाला कायद्याची माहिती हवी

प्रत्‍येकाला कायद्याची माहिती हवी

sakal_logo
By

59932
जानवली : येथील कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना न्या.टी.एच. शेख.

प्रत्‍येकाला कायद्याची माहिती हवी

न्या.टी.एच.शेख : जानवली, वागदे येथे मार्गदर्शन

कणकवली, ता.२ : प्रत्‍येक नागरिकाला कायद्यांची माहिती असायला हवी. मुले, महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक यांच्या हितासाठी अनेक कायदे आहेत. तसेच घरगुती हिंसाचार, विभक्‍त कुटुंब, पालन-पोषण आणि आर्थिक क्षमता याअनुषंगानेही न्याय मागता येतो. त्‍यामुळे समाजातील सर्व घटकांनी कायद्याची माहिती करून घ्यावी असे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांनी केले.
कणकवली न्यायालयाच्यावतीने आज जानवली आणि वागदे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. यात न्या. टी.एच. शेख यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. मिलिंद मोहन सावंत, नायब तहसीलदार तानाजी रासम, कणकवली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, राजेंद्र शिंदे, जानवली सरपंच शुभदा रावराणे, पोलीस पाटील मोहन सावंत यांच्यासह जानवली गावातील ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक, विधी स्वयंसेवक उपस्थित होते.
न्या.शेख यांनी न्यायालयीन तडजोड प्रक्रिया, तडजोडीचे फायदे, लोकअदालत प्रक्रिया तसेच न्यायालयीन चालणारी प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. अॅड. एम. एम. सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकार व योजना याबाबत मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार तानाजी राजम यांनी संजय गांधी निराधार योजना, राजीव गांधी योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना सांगितल्या. विस्तार अधिकारी श्री.शिंदे यांनीं ग्रामपंचायत कर वसुली, त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामसेवक सौ.लाड यांनी सूत्रसंचालन केले. वागदेतील शिबिरात ॲड. प्राजक्ता शिंदे, पोलिसपाटील सुनील कदम, सरपंच रुपेश आमडोसकर, जगन्नाथ गोसावी, महेश कदम, प्रकाश कदम, ललित घाडीगांवकर, संदीप गावडे, मंगेश सावंत, विलास गोलतकर, ममता सावंत, रूपा गावकर आदी उपस्थित होते.