...तर जनता सुखावली असती ः सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर जनता सुखावली 
असती ः सावंत
...तर जनता सुखावली असती ः सावंत

...तर जनता सुखावली असती ः सावंत

sakal_logo
By

59938
डी. के. सावंत

...तर जनता सुखावली
असती ः सावंत

भ्रष्टाचार करणार नसल्याच्या शपथीवर टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लाच घेणार नाही, देणार नाही’, अशी शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यापेक्षा दप्तर दिरंगाई खपवून घेणार नाही, असे म्हटले असते तर जनता सुखावली असती, असे सामाजिक कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी सांगितले.
सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्यासाठी शपथ देतानाचा जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला. वास्तविक त्या शपथेला काहीच अर्थ नाही. ती शपथ कर्मचाऱ्यांकडून घेताना त्यांना स्वतःच्या मुलांच्या किंवा आईच्या डोक्यावर हात ठेवून घ्यायला भाग पाडायला हवे होते. ही त्यांनी घेतलेली शपथ पाहिल्यानंतर बालवाडीतील मुलांची आठवण आली. कारण शपथेनंतरही त्यांच्या कार्यपद्धतीवर व लाच घेण्यावर काही फरक पडेल, यावर लहान मुलही विश्वास ठेवणार नाहीत. काहीही कारण नसताना महिनोंमहिने प्रकरणे टेबलावर दाबून ठेवून तडजोड करून निर्णय घेणे हे नेहमीचेच. या सगळ्याला अपवाद असलेले काही इमानदार कर्मचारी आहेत; पण त्यांचे प्रमाण कमीच. याची पुराव्यासह उदाहरणे देऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना शपथेपेक्षा टेबलावरील प्रकरणे मुदतीत हलविण्याचे आदेश देणे गरजेचे होते. त्याचीच खरी गरज होती. दप्तर दिरंगाई हा सर्वात मोठा शाप येथील जनता भोगत आहे. त्यामुळे जनतेचा पैसा व वेळेचा अपव्यय होऊन सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. महागाई वाढण्याचे हेही एक कारण आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.