देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था
देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था

देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२p१३.jpg-
५९९४५

(देवरूख ः देवरूख-मार्लेश्वर रस्त्यावर खड्डे पडून झालेली दुरवस्था)
-----------

देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था

भाविक, वाहनचालकांना त्रास ः बांधकाम विभागाला निवेदन

साडवली, ता. २ ः संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणारा रस्ता सद्यःस्थितीला अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मनोहर गुरव यांनी केली असून या मागणीचे निवेदन मंचतर्फे देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
देवरूखपासून मार्लेश्वर देवस्थान सुमारे १८ किमी अंतरावर असून या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मुरादपूर ते निवेखुर्दपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला असून या मार्गावरून प्रवास करताना भाविक व वाहचालकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ नावाला राहिले आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहचालकांची हाडे खिळखिळी होत असून कंबरदुखी व मणक्याचा त्रासदेखील होत असल्याचे वाहनचालकांमधून बोलले जात आहे. मुरादपूर ते निवेखुर्दपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महाराष्ट्र समविचारी मंचचे व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सर्व पदाधिकारी यांच्या सहीने मुख्यमंत्री व संबंधित विभागाचे मंत्री, जिल्हाधिकारी यांना तक्रारअर्ज आणि निवेदन सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र समविचारी मंचचे व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वरच्या वतीने याबाबत आवाज उठवणार आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुक्याचे प्रचार संयोजक मनोहर गुरव यांनी सांगितले.