दाभोळ-जेसीआय इंडिया झोनच्या उपाध्यक्षपदी अतुल गोंदकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-जेसीआय इंडिया झोनच्या उपाध्यक्षपदी अतुल गोंदकर
दाभोळ-जेसीआय इंडिया झोनच्या उपाध्यक्षपदी अतुल गोंदकर

दाभोळ-जेसीआय इंडिया झोनच्या उपाध्यक्षपदी अतुल गोंदकर

sakal_logo
By

rat२p९.jpg
59927
म्हापसा (गोवा) जेसीआय इंडिया झोन ११च्या झोन काँन्फरन्समध्ये सहभागी झालेले जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी अतुल गोंदकर व त्यांचे सहकारी.
----------
जेसीआय इंडिया झोनच्या
उपाध्यक्षपदी अतुल गोंदकर
दाभोळ, ता. २ः म्हापसा (गोवा) येथे झालेल्या जेसीआय इंडिया झोन ११ च्या झोन काँन्फरन्समध्ये जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी अतुल गोंदकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सन २०२२ मध्ये जेसीआय दापोलीची धुरा सांभाळताना अनेक लोकोपयोगी उपक्रम जेसी अतुल गोंदकर यांच्या नेतृत्वामध्ये जेसीआय दापोलीच्या वतीने राबवण्यात आले. त्याचीच दखल घेऊन जेसीआय इंडियाच्या झोन ११ च्यावतीने जेसीआय दापोलीला या वेळी संधी देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा करणाऱ्या जेसीआय दापोली या संस्थेला पहिल्यांदाच झोन विभागात या पदावर काम करण्याची संधी मिळाली. दापोलीला मिळालेल्या या संधीचे नक्कीच सोने करून पुन्हा एकदा दापोलीला गौरान्वीत करायचा मानस या वेळी जेसीआयचे नवनिर्वाचित झोन उपाध्यक्ष जेसी अतुल गोंदकर यांनी सांगितला.
झोन ११ च्या यंदाच्या झोन कॉन्फरन्समध्ये जेसीआय दापोली जेसीआय इंडियाच्या नॅशनल फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या वन लोकल ऑर्गनायझेशन वन सस्टेनेबल प्रोजेक्ट या ॲवॉर्डचा सर्वोच्च मानकरी ठरला तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचा उपविजेता ठरण्याचा मान जेसीआय दापोलीने मिळवला. या वेळी जेसीआय दापोलीचे माजी अध्यक्ष व झोन कॉर्डिनेटर जेसी कुणाल मंडलिक, सेक्रेटरी जेसी मयुरेश शेठ व खजिनदार जेसी प्रसाद दाभोळे आदी उपस्थित होते.